विलिअमसनने टाकले कोहली रूटला मागे…

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या शतकी खेळीमुळे न्यूजीलँडचा कर्णधार केन विलिअमसने आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट यांना मागे टाकून दुसरा क्रमांक पटकावला. भारताविरुद्ध केलेल्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने आपलं पाहिलं स्थान मजबूत केलं.सध्या क्रिकेट जगतात फॅब फोर अशी ओळख असणारे खेळाडू विराट, स्मिथ, रूट आणि विलिअमसनहे पहिल्या चार क्रमांकावर आहेत.
दुसऱ्या कसोटीमधील ८ विकेटच्या विजयी खेळीमुळे आर अश्विनने आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत पुन्हा प्रथम स्थान पटकावले. पहिल्या कसोटीमधील लौकिकाला साजेशी न झालेल्या कामगिरीमुळे त्याने आपले हे स्थान गमावले होते. त्याचबरोबर शाकिब-उल-हसनची श्रीलंकेविरुद्धची खालावलेली कामगिरी अश्विनच्या पथ्यावर पडली.
आयसीसी कसोटी गोलंदाजीमध्ये जडेजा आणि अश्विन यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर असून जडेजाची पहिल्या डावातील तर अश्विनची दुसऱ्या डावातील कामगिरी त्यासाठी उपयुक्त ठरली.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना १६ मार्चपासून रांची येथे सुरु होणार आहे. यातील खेळाडूंची कामगिरी त्यांच्या क्रमवारीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

आयसीसी कसोटी फलंदाज क्रमवारी
१. स्टिव्ह स्मिथ
२. केन विलियमसन
३. जो रूट
४. विराट कोहली

आयसीसी कसोटी गोलंदाज क्रमवारी
१. रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन
३. जोश हेझलवूड
४. रंगना हेराथ

आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारी
१. आर. अश्विन
२. शाकिब-उल-हसन
३. रवींद्र जडेजा
४. मिशेल स्टार्क