शशांक मनोहरांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा…!!

आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आज त्यांचा राजीनामा जाहीर केला व काही वयक्तिक कारणांमुळे तो देत आहे असे सांगितले. गेल्यावर्षी मे २०१६ मध्ये त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.

त्यांचा कार्यकाळ हा २ वर्षांचा असणार होता पण केवळ १० महिन्यांमध्येच त्यांनी आपला राजीनामा दिला. अध्यक्षपदाचा कार्यभार सुरु केल्या पासुन ते क्रिकेट मधल्या मुख्य तीन संघ (भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया) यांचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होते. आता कोणाला हा कार्यभार सांभाळायला मिळतोय ते मात्र बघावे लागेल.

शशांक मनोहरांनी भूषवलेली पदे:

२ वेळा बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले

१ वेळा (१० महिने) आयसीसीचे अध्यक्षपद