कॅप्टन कोहलीने घेतली राहणेची बाजू…

बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यांमध्ये शेवटच्या कसोटीचा त्रिशतकवीर करून नायर ऐवजी महाराष्ट्रीयन अजिंक्य राहणेला संधी दिली जाणार आहे. बांगलादेश प्रथमच भारतात कसोटी खेळण्यासाठी येत आहे. चेन्नई कसोटीमध्ये दमदार त्रिशतक झळकावूनही करून नायरला हैद्राबाद येथे होणाऱ्या कसोटी मध्ये स्थान देण्यात आले नाही.

त्याबद्दल विचारले असता कोहलीने अजिंक्य रहाणेच्या निवडीची पाठराखण केली. “होय करुणने त्रिशतक नक्कीच झळकावले. पण भारतासाठी आजपर्यंत अजिंक्यने दिलेल्या योगदानाकडेही डोळेझाक करून चालणार नाही.” कॅप्टन विराट कोहली म्हणाला.

भारत प्रथमच बांगलादेश विरुद्ध भारतात कसोटी सामने खेळत आहे. आणि भारताने सर्वच प्रकारच्या क्रिकेट मध्ये बांगलादेश विरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. ह्या सामान्याकडे ऑस्ट्रेलिया विरुद्धची रंगीत तालीम म्हणून पहिले जात आहे. त्यात अजिंक्य राहणे सह सर्वांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल.