कोहलीने ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांवर फेकली बाटली: ऑस्ट्रेलियन दैनिक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी मधील वाद संपतो आहे असे वाटतच असतानाच नव्या वादाने डोकेवर काढले आहे. ऑस्ट्रेलिया मधील आघाडीचे दैनिक ‘द डेली टेलिग्राफ’ दिलेल्या वृत्तानुसार भारतीय कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक कुंबळे यांचं वर्तन हे दुसऱ्या कसोटी सामन्यावेळी योग्य नव्हतं.
ह्या वृत्तपत्राच्या म्हणणाऱ्यानुसार “दुसऱ्या सामन्यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन अधिकारयांच्या दिशेने एनर्जी ड्रिंकची बाटली फेकली. आणि या सर्वांच्या मागे भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे होता.”
“प्रशिक्षकांना अधिकारांच्या रूममध्ये जायला परवानगी असते. पण सामान्यांच्या मध्यात तेथे जाणे चुकीचं आहे. ” असही ह्या दैनिकाने कुंबळे बद्दल म्हटले आहे.
भारताने सामना जिंकला त्यावेळी भारतीय कर्णधार कोहली हा पीटर हॅन्डकॅम्सशीही नीट वागला नव्हता.
आपल्या लेखात कोहलीवर तोफ डागताना दैनिक टेलेग्राफने पुढे असेही म्हटले आहे, “भारतामध्ये जे क्रिकेटबद्दल जी खेळ भावना तयार झालं आहे त्याला कर्णधार नात्याने विराट कोहलीने गालबोट लावण्याचं काम केलं जे एके काली अर्जुन रणतुंगाने केले होते.”
यापूर्वीही ऑस्ट्रेलियन दैनिकांनी वेळोवेळी भारतीय संघ आणि खेळाडू यांच्या विरुद्ध भूमिका घेतल्या आहेत. सद्य स्थितीत कोहली किंवा कुंबळे यांच्या अश्या वर्तनाविरुद्ध कुणीही पुढे येऊन अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.