कोण घेणार मिटचेल स्टार्कची जागा..???

सध्या सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया मधल्या कसोटी मालिकेमधून मिटचेल स्टार्क आणि मिटचेल मार्श या दोघांनी दुखापती मुळे माघार घेतली आहे. स्टार्कला पायाला दुखापत झाली आहे तर मार्शला खांद्याला दुखापत झाली आहे. मिटचेल मार्श ऐवजी व्हिक्टोरियाचा ऑलराऊंडर मार्कस स्टोइनीस संघात घेण्यात आले आहे.

आता सर्वांचे डोळे लागले आहेत ते स्टार्कची जागा कोण घेते त्यावर. मिटचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा पाया होता. त्याचा वेग, स्विंग आणि विकेट घेण्याची क्षमता ह्यामुळे तो कायम एक स्फोटक गोलंदाज ठरला आहे. स्टार्कचा गोलंदाजीचा सर्वसाधारण वेग हा ताशी १४५ किलोमीटर असल्यामुळे योग्य ठिकाणी पडलेला चेंडू खेळणे अवघड जातो. अचूक टप्प्याची गोलंदाजी हे स्टार्कचे मुख्य अस्त्र राहिले आहे. कमिन्स आणि पॅटिंसन याआधी भारतविरुद्ध खेळले आहेत पण जर त्यांना संधी दिली तरी ते स्टार्क इतके प्रभावी ठरतील हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आता उर्वरीत दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया कोणती रणनीती आखते ते महत्वाचे आहे. सध्या त्याची जागी कोण घेईल यासाठी हे पाच गोलंदाज निवडलेत ज्यापैकी एकाला संधी मिळू शकेल.

१. पॅट कमिन्स

सामने : ०१ | बळी : ८ | सरासरी : १८. ६० | स्ट्राईक रेट : १३ | सर्वोकृष्ट आकडे : ४-४७ | ५ विकेट : ० | १० विकेट : ०

२. जेसन बेहरेनडॉर्फ

सामने : ०६ | बळी : ३१ | सरासरी : १५. ९० | स्ट्राईक रेट : ३१. ४ | सर्वोकृष्ट आकडे : ९-३७ | ५ विकेट : ३ | १० विकेट : १

३. जेम्स पॅटिंसन

सामने : ०३ | बळी : १३ | सरासरी : २०. ४६ | स्ट्राईक रेट : ३३. ६० | सर्वोकृष्ट आकडे : ४-४८ | ५ विकेट : ० | १० विकेट : ०

४.  चाड सेयर्स

सामने : ०९ | बळी : ५० | सरासरी : १८. ६० | स्ट्राईक रेट : ४२. २ | सर्वोकृष्ट आकडे : ६-३२ | ५ विकेट : ४ | १० विकेट : १

५.  ख्रिस ट्रेमेन

सामने : ०८ | बळी : ३७ | सरासरी : १८. २४ | स्ट्राईक रेट : ४०. ८ | सर्वोकृष्ट आकडे : ४-२२ | ५ विकेट : ० | १० विकेट : ०

वारील आकडेवारी २०१६-१७ ला झालेल्या शेफील्ड शिल्ड सीझनची आहे.

Comments are closed.