सध्या सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश ह्या कसोटी मालिके मध्ये श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज रंगना हेरथने नवा विक्रम स्तापित केला आहे. सर्वाधिक बळी घेणारा (३६५ बळी) तो पहिला डावखुरा गोलंदाज ठरला आहे. ह्यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या डॅनियल व्हेट्टोरीच्या नावी होता (३६२ बळी).
ह्याबरोबरच तो आजवर सर्वाधिक बळी घेतलेल्या यादीत १९व्या स्थानावर येऊन पोचला आहे. श्रीलंकेच्या सर्वात यशस्वी गोलंदाजच्या म्हणजेच मुथया मुरलीधरन (८०० बळी) नंतर सर्वाधिक बळी हे हेरथचे आहेत. सर्वाधिक बळी घेणाऱ्या डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये हेरथ पुढे फक्त पाकिस्तानचा आक्रमक स्विंगर वसिम अक्रम (४१४ बळी) च्या मागे आहे.
कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक बळी घेणारे डावखुरे गोलंदाज:
|
नाव | सामने | बळी | सरासरी |
१. | वसिम अक्रम | १०४ | ४१४ | २.५९ |
२. | रंगना हेरथ | ७९ | ३६५ | २.७७ |
३. | डॅनियल व्हेट्टोरी | ११३ | ३६२ | २.५९ |
४. | चामिंडा वास | १११ | ३५५ | २.६८ |
५. | मिशेल जॉन्सन | ७३ | ३१३ | ३.३३ |