म्हणून सचिनला लंडन शहर आवडते

मास्टर ब्लास्टर सचिनचा चाहता वर्ग संपूर्ण जगात आहे. त्यामुळे सचिन नेहमीच चाहत्यांच्या गर्दीत हरवलेला असतो. भारत काय अगदी जगातील कोणत्याही शहरात गेलं तरी सचिनचे फॅन्स त्याच्या पाठीमागे असतात.

मास्टर ब्लास्टर सचिनला नेहमी एक प्रश्न केला जातो की तुझं आवडत शहर कोणतं. सचिन नेहमी या प्रश्नाचं उत्तर लंडन आणि मुंबई असं देतो.
त्याच कारणंही तसंच आहे. मास्टर ब्लास्टर सचिन लंडन शहरात एका सामान्य नागरिकासारखा फिरू शकतो. त्याला तिकडे चाहते त्रास देत नाहीत किंवा त्याच्या पाठीमागे लागत नाहीत.

जेष्ठ मराठी क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी नुकताच एक इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात सचिन एका लंडन मधील एका बागेत फिरण्यासाठी आलेला आहे. आजूबाजूने लंडन मधील नागरिक धावताना, फिरताना दिसत आहेत. तरीही कुणीही सचिनचा पाठलाग करत नाही किंवा फोटोसाठी विचारात नाही. सचिन या बागेत निवांत फिरताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये लेले सर म्हणतात, ” ओळखता का या माणसाला, जगात कुठे हा आरामात फिरू शकतो? तीच मजा आहे लंडनची. म्हणून त्याला लंडन आवडते”

View this post on Instagram

That's why Sachin Tendulkar loves London

A post shared by Sunandan Lele (@lelesunandan) on

Comments are closed.