विडीओ: मधमाशीमुळे शॉन मार्शला जिवदान, विकेटकीपर डीकॉकने दवडली स्टम्पिंगची संधी

जोहान्सबर्ग : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव २२१ धावांत संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेकडे आता २८२ धावांची आघाडी आहे. 

या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर  मधमाशी चावल्यामुळे शॉन मार्शला एकप्रकारे जीवदान मिळाले. तो जेव्हा ६३ चेंडूत १५ धावांवर खेळत होता तेव्हा केशव महाराजच्या गोलंदाजीवर त्याला स्टम्पिंग करण्याची संधी विकेटकीपर क्विंटन डीकॉकने सोडली. 

हे स्टम्पिंग सोडण्याचे कारण म्हणजे क्विंटन डीकॉकच्या डाव्या हाताला मधमाशीने घेतलेला चावा. स्टम्पिंगची एक चांगली संधी चालून आली असतानाच क्विंटन डीकॉकला त्याच वेळी मधमाशीने चावा घेतला. 

विशेष म्हणजे या मिळालेल्या संधीचा शॉन मार्शलाही फायदा घेता आला नाही आणि तो केवळ एक धावेची भर घालत १६ धावांवर बाद झाला. 

याचा विडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.