हार्दिक पांड्याची अशी केली केएल राहुल आणि दिनेश कार्तिकने हटाई

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला श्रीलंकेत चालू असलेल्या तिरंगी टी २० मालिकेसाठी विश्रांती दिली आहे. त्यामुळे केएल राहुल आणि दिनेश कार्तिकने हार्दिकला एक खास संदेश दिला आहे.

बीसीसीआयने आज ट्विटरवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल आणि कार्तिक यांनी हार्दिकविषयी मजेदार गप्पा मारत त्याला हा संदेश दिला आहे. त्यांनी या गप्पांमध्ये हार्दिकला गमतीने म्हटले आहे, त्यांना त्याची आठवण येत नाही.

या व्हिडिओमध्ये हार्दिकच्या संघातील अनुपस्थितीबद्दल बोलताना कार्तिक म्हणाला, “हे खूप आरामदायी आहे. आम्हाला नक्कीच तुझी आठवण येत नाही. सगळं काही मस्त आहे.”

तसेच पुढे राहुल म्हणाला, ” हे खूप शांततापूर्ण आहे. कारण हार्दिक हा सतत प्रसिद्धीच्या झोतात असतो. त्याला सरावाचे लक्ष वेधून घ्यायचे असते. सर्वांनी माझी ऐका… आम्हीला यात कोणताही रस नाही. आम्हाला हे नको आहे, मित्रा.”

राहुल आणि कथिकच्या या मजेदार गप्पांवर आणि संदेशावर हार्दिकनेही ट्विटरवर उत्तर दिले आहे. त्याने ट्विट केले की, “तरीही मी तुमच्यावर प्रेम करतो.”

भारतीय संघाने तिरंगी टी २० मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत पहिल्या दोन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध प्रभाव स्वीकारला आहे. तर दुसऱ्या सामन्यात बांग्लादेशविरुद्ध विजय मिळवला आहे.