Marathi Film Tendulkar Out is all set to release on Friday 15th November

अनेक दिवस रसिक प्रेक्षक ज्याची वाट पाहत होते तो आजच्या पिढीचे मर्म मांडणारा “तेंडुलकर आऊट” या सिनेमाची प्रतीक्षा आता संपली असून येत्या शुक्रवारपासून हा सिनेमा रुपेरी पडद्यावर मोठ्या दिमाखात झळकणार आहे.
तेंडुलकर ही व्यक्ती नसते तो असतो आपल्या मनातला एक पराकोटीचा आदर्श. एकीकडे हा पराकोटीचा आदर्शवाद घेऊन जगणार्‍या सुनील तेंडुलकर या माणसाची ही कथा. आपल्या घरात तेंडुलकर जन्माला यावा अशी आस बाळगणार्‍या सुनील तेंडुलकर या चित्रनिर्मात्याच्या आयुष्यातला एक दिवस हा त्याच्यासाठीच नव्हे तर नायर, लेफ्टी, अब्बास यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा सामना असतो. या सामन्यात अनेक डावपेच, गुगली, चौकार, षटकारांच्या फैरी झडतात. हा सामना रोमहर्षक होत जातो. हा सामना कधी आणि कसा फिरेल याची उत्कंठा शिगेला पोहचते. कुणाची जीत? कोणाची हार? कोणाचे मरण? कोण जन्मेल?  कसा? कधी आणि कुठे ? ? याबद्दल धडधड वाढू लागते. खेळ क्रिकेटचा आणि आयुष्याचासुद्धा अर्थात तेंडुलकर आऊट.
स्वप्नील जयकर या तरुण दिग्दर्शकाने मांडलेला हा अत्यंत नव्या शैलीतल्या ह्या सिनेमाची झी टॉकीजने प्रस्तुती केली असून सुधा प्रोडक्शनसने या सिनेमाची निर्मिती केली आहे. “बोम्बे मेरी जान” फेम योगेश जोशी  याने ह्या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. सयाजी शिंदे, सई ताम्हणकर, संतोष जुवेकर, अनिकेत विश्वासराव, विजय मौर्य, अतुल परचुरे, नीलम शिर्के, टेडी मौर्य अशी जबरदस्त तगडी स्टारकास्ट आपल्याला या सिनेमात पाहायला मिळेल. उद्या १५ नोव्हेंबरपासून हा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे