कोणाचं पारडं जड? – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत वि. ऑस्ट्रेलिया ह्यात होणार्या पहिल्या कसोटी सामन्याला ३ दिवसात सुरवात होणार आहे. पुणेकरांची कसोटी सामना पाहण्याची इच्छा अखेर पूर्णत्वाला येणार आहे. पुण्यात प्रथमच होत असलेल्या कसोटीला कसा प्रतिसाद मिळतोय ते पाहावे लागेल. आजवर झालेल्या टी-२० व एकदिवसीय सामन्यात पुण्याच्या मैदनावर धावांचा वर्षाव झाला पण कसोटी सामन्याची खेळपट्टी कशी असेल ह्यावर आता सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी कसोटी मालिका ही एक प्रतीष्ठेची लढाई ठरणार आहे. भारतीय संघ आजवरच्या सर्वोत्तम लयीत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तसेच ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर ३-० अशी मात करत आपणही तितक्याच लयीत आहोत हे दाखवून दिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपुढे आपले फलंदाज तग धरू शकतील का व आपल्या फिरकीच्या जाळ्यात त्यांचे फलंदाज अडकतील का हे आता मैदानातच कळेल. आजवरच्या सर्व बोर्डर-गावस्कर सामन्यांमध्ये अनेक अविस्मरणीय क्षण आपल्याला अनुभवायला मिळाले, ते स्लेद्गिंग असो वा फलंदाजी, पण ह्यावेळी हे दोन संघ काय नवीन रणनीती आखून मैदानात उतरतात ते बघायला मजा येईल हे मात्र नक्की ..!!!