आयपीएल २०१७ लिलावतील हिरो आणि झिरो

१०व्या IPL मोसमाची सुरवात एप्रिल पासून होणार आहे. त्यातल्या खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया आज सुरु झाली. सर्व संघांकडे ठराविक रक्कम शिल्लक आहे ज्यातून त्यांना लिलावात सहभागी झालेल्या खेळाडूंमधून निवड करायची आहे. IPLच्या इतिहासात प्रथमच अफगाणिस्तानचा मोहम्मद नाबी खेळणार हैदराबाद संघाकडून.

५ व्या टप्प्या अखेरीस पुणे संघाने १४.५ कोटी खर्चून इंग्लंडच्या बेन स्टोक्स वर शिक्कार्मोर्तब केला. तसेच बंगलोर संघाने तयमाल मिल्स सारख्या नवख्या खेळाडूवर चक्कं १२ कोटी रुपये खर्च केले. जशी नवख्या खेळाडूंना संधी मिळाली तशीच अनुभवी खेळाडूंना मात्र पाठ दाखवण्यात आली. इरफान पठाण, थिसारा परेरा, फरहान बेहरादिन, कुसल परेरा, जेसन होलडर, परवेझ रसूल, डेरेन ब्रावो, मार्लोन समुएल्स, चेतेश्वर पुजारा, आर.पी सिंग सारखी नावे अजूनही कोणत्याच संघात जागा मिळवू शकले नाहीत. ह्या उपर पुणे संघाने धोनी ला कर्णधारपदावरून काढून टाकले आहे आणि स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर संघाची जबाबदारी सोपवली आहे. आता हे पाहावे लागेल की पुणेकर ह्या गोष्टीवर आपले काय मत व्यक्त करतात..!!