लवकरच तुमच्या भेटीला येणार ‘भुलभुलैय्या’ चित्रपटाचा सीक्वेल

42

भूषण कुमार आता २००७ सालच्या ‘भुलभुलैय्या’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वेल करणार असल्याचे समोर आले आहे.

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘भूषणला भुलभुलैय्याचा सीक्वेल करायचाच होता. फरहाद सामजी हा सीक्वेल लिहिणार असून तोच दिग्दर्शित सुद्धा करणार आहेत. चित्रपटाचे लिखाण चालू असून कथा पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात नक्की कोण काम करणार आहे हे नक्की करण्यात येईल. चित्रपटात पूर्ण नवीन व्यक्तिरेखा दिसतील.’ भूषण कुमार यांच्या ‘टी सीरिज’ या निर्मिती संस्थेने ‘भुलभुलैय्या २’ हे नाव नोंदवल्यानंतर ही बातमी समोर आली आहे.

You might also like