‘ती & ती’चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित…..

53

‘ती & ती’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या अर्बन रोमँटिक कॉमेडी चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका आहे. मृणाल कुलकर्णीचा दिग्दर्शिका म्हणून हा तिसरा मराठी चित्रपट आहे.प्रेमाचा त्रिकोण, एक आगळी-वेगळी कथा आणि त्याचसोबतीला लंडन सफारी या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

आनंद पंडीत यांच्या मोशन पिक्चर्सच्या सहकार्याने गुझबम्प एंटरटेनमेंट आणि हायपरबीस मिडिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. या चित्रपटासाठी पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांचे फॅन्स देखील ‘ती &ती’ साठी खूपच जास्त आतुर आहेत. भन्नाट लव्हस्टोरी असलेला ‘ती &ती’ चित्रपट येत्या १ मार्च २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

महत्वाच्या बातम्या –

You might also like