Sasubai Gelya Chorila Marathi Movie

Produced By :Mahajan Films
Directed By : Dnyaneshwar Aangane
Cast : Vishakha Subhedar, Kuldeep PawarArun Kadam,Girish Pardeshi,Amit Bhanushali,Ashlesha Patil,Tejaswi Patil
Screenplay By : Purshottam Jaronde
Written By : Purshottam Jaronde
Music : Vijay Desai
Genre : Comedy
Release Date : 15 February 2013
Synopsis :
हा प्रवास आहे एका स्त्रीच्या आयुष्यातील एका वर्षातील घडलेल्या सुख-दुखा:चा. आशाताई देवधर ह्या उद्योगपती आदिनाथ देवधर यांच्या पत्नी. ..एकीकडे त्या आपले वाढलेले वजन कमी करण्याचा प्रयत्न करताहेत, तर दुसरीकडे वाटेल तसं खा खा खाताहेत… त्यामुळे हास्याचा विषय बनल्या आहेत… अश्यातच एकेदिवशी आदिनाथ देवधर यांचा प्रतिस्पर्धी जयसिंग माने त्यांना शह देण्यासाठी गुंडांकडून आशताइचे अपहरण करतो. आणि…
एखादी घटना एखाद्याच्या आयुष्यात घडते… नि ती त्याच्या दृष्टीने काहीतरी नाविन्यपूर्ण आसते. अदभुत असते, आश्चर्य वाटावी अशी असते. किंबहुना अशी घटना यापूर्वी त्याच्या आयुष्यात घडलेलीच नसते. जीवनातील अनंत घटनांचे नानाविध पैलू उलगडून सांगणारा हा चित्रपट आहे. ह्या चित्रपटात फक्त विनोदासाठी विनोद नसून मानवी नात्यातील गुंतागुंतीवर व भावनांवरही प्रकाश टाकणारा असेल. या सगळ्या प्रवासात वेगवेगळ्या प्रवृत्तीची व सगळ्या वयोगटातील पात्र त्यांच्या सुखदुख:सोबत आपल्याला भेटणार आहेत.
या प्रवासात हसत खेळत, टीकेचे चिमटे काढत, गमतीशीरपणे खिल्ली उडवत आयुष्यातील सुखदुखा:शी प्रामाणिक राहून प्रबोधन करणारा व पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप घेणारा चित्रपट आपण सर्वांना निश्चितच भावेल.
सासूबाई गेल्या चोरीला या चित्रपटाची निर्मिती श्री. बंडू महाजन यांच्या महाजन फिल्म्स या निर्मिती संस्थेच्या वतीने करण्यात आली असून या चित्रपटाचे लेखन श्री. पुरुषोत्तम जरोंडे यांनी केले असून श्री. ज्ञानेश्वर अंगाने यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.