कौन बनेगा करोडपती मराठीत येतंय म्हटल्यावर सर्वांना उस्तुकता लागून राहिली होती ती म्हणजे सूत्रसंचालन कोण करणार,पण हि उस्तुकता आता एका नावावर येउन थांबलीय, ते नाव म्हणजे “सचिन खेडेकर”. सचिनच कोण होईल मराठी करोडपतीचे सूत्रसंचालन करणार आहे.
शोची सर्व तयारी चालू झाली आहे, आणि मे महिन्यात हा शो सुरु होईल.
सचिन खेडेकर म्हणाले “कौन बनेगा करोडपती सुरु व्हायच्या आधी २००० साली मी बच्चन साहिबांची एक मुलाकत वाचली होती, त्यात त्यांनी म्हटले होते कि त्यांनी ३ महिने तयारी केली होती. केबीसी ला भरपूर यश मिळाले त्याच्या १० % जरी यश मिळाले तर मी समाधानी होईन.”
अमित फाळके, ईटीवी मराठी वाहिनीचे नॉन फ़िक्शिन प्रोग्रामिंग हेड म्हणाले, “केबीसी म्हणजे मनोरंजन, ज्ञान आणि भावना यांचा संगम होय,पण शो यशस्वी व्हायला तुम्हाला एक चांगला सूत्रधार हवा, केबीसीचे सूत्रसंचालन करायला सचिन हाच उत्तम पर्याय आहे.”