नेहा पेंडसेवर का होतोय शुभेच्छांचा वर्षाव ?

271

नेहा पेंडसेने आजवर चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. नेहा बिग बॉसमध्ये देखील झळकली होती. बिग बॉसच्या घरात तिला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. नेहाचे लग्न अथवा साखरपुडा लवकरच होणार असल्याची चर्चा मीडियात रंगली आहे.

अभिजीत खांडकेकरने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिजीत, श्रुती मराठे, नेहा पेंडसे दिसत आहेत. विशेष म्हणजे या फोटोत नेहाने स्वतःच्या तोंडावर बोट ठेवले आहे आणि त्यासोबतच या फोटोच्या खाली अभिनंदन असे लिहिण्यात आले आहे. या फोटोवर नेहाच्या फॅन्सने देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

नेहा लग्न करतेय का असा प्रश्न तिच्या फॅन्सना पडला आहे. याविषयी इंडिया फोरमशी बोलताना नेहाने या फोटोबाबत गप्पा मारल्या आहेत. लोक जो विचार करत आहेत असे काहीही नाही असे असा या मुलाखतीत तिने खुलासा केला आहे. याविषयी नेहा सांगते, माझे लग्न होत नाहीये की माझा साखरपुडा झालेला नाहीये. मी बिग बॉस मराठीमध्ये एंट्री करतेय हे देखील खरे नाहीये. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या फोटोतील सगळेचजण अनेक वर्षांपासून माझे फ्रेंड्स असून आम्ही कित्येक दिवसांनंतर भेटलो होते. आम्ही आमचे हे रियुनियन खूपच एन्जॉय केले.

 

View this post on Instagram

Congratulations 🤟🏻 #buddies #sareelove #marathi

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on