देवधर ट्रॉफीमध्ये केदार जाधव एकमेव महाराष्ट्रीयन खेळाडू

२५ ते २९ मार्च रोजी विझाग येथे होणाऱ्या देवधर ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट बोर्डने इंडिया ब्लू आणि इंडिया रेड संघाची घोषणा केली. दुखापतीमधून सावरलेल्या रोहित शर्माकडे इंडिया ब्लू तर गुजरातचा रणजी विजेता कर्णधार पार्थिव पटेलकडे इंडिया रेडच नेतृत्व दिल आहे.
शनिवारपासून सुरु होणाऱ्या या लढतींमध्ये विजय हजारे ट्रॉफी विजेता तामिळनाडू हा तिसरा संघ आहे. विजय हजारे ट्रॉफी हि सॅन १९७३-७४ सालापासून खेळली जाते. रणजी ट्रॉफी प्रमाणेच देवधर ट्रॉफी भारतात प्रतिष्ठेची एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धा आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव हा पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखालील इंडिया रेड संघाकडून खेळणार आहे . केदारने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ७ सामन्यात ५३.५७ च्या सरासरीने ३७५ धावा केल्या आहेत. ह्याच वर्षी इंग्लंड मध्ये होणाऱ्या चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये जागा मिळविण्यासाठी ही केदारसाठी मोठी संधी आहे.
ऑक्टोबर २०१६ मध्ये न्यूजीलँड बरोबर खेळताना दुखापती झालेल्या रोहित शर्माकडे इंडिया ब्लूच नेतृत्व दिल आहे. रोहितने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा मुंबईकडून दोन सामने खेळले आहेत पण १६ आणि ४ धावा अशी निराशाजनक कामगिरी केली आहे. पार्थिव पटेलकडे इंडिया रेडच नेतृत्व दिल असून त्याने रणजी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये जबदस्त खेळ केला आहे. त्याला निवड समितीचे लक्ष वेधून घ्यायची मोठी संधी यामुळे मिळणार आहे.
महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे तर २८ खेळाडूंच्या चमूत सुरेश रैनाला स्थान देण्यात आले नाही. धोनीने सध्या पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी मध्ये झारखंडच नेतृत्व करताना ८ सामन्यात ६६ च्या सरासरीने ३३० धावा केल्या आहेत.
सय्यद अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये उपयुक्त गोलंदाजी करणाऱ्या हरभजन सिंगला संधी देण्यात आली आहे. त्याच्याकडे चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी गांभीर्याने पहिले जात आहे तर आशिष नेहराचा संघात समावेश करण्यात आला नाही. नेहराची विजय हजारे ट्रॉफीमधील कामगिरी एकंदरीतच चांगली असल्यामुळे निवड समिती सदस्य त्याच्याबद्दल समाधानी आहेत.
विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये ४ बळी घेणाऱ्या मोहम्मद शमीला संघात स्तःन देण्यात आले नाही . त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारया शेवटच्या कसोटीमध्ये संधी मिळू शकते.

संघ:
इंडिया ब्लु:

रोहित शर्मा(कर्णधार), मनदीप सिंग, श्रेयस अय्यर, अंबाटी रायडू, मनोज तिवारी, रिषभ पंत(यष्टीरक्षक), दीपक हुडा, हरभजन सिंग, कृणाल पांड्या, शाहबाझ नदीम, सिद्धार्थ कौल, शार्दुल ठाकूर , प्रसिद्ध क्रिष्णा, पंकज राव

इंडिया रेड:

पार्थिव पटेल(कर्णधार/ यष्टीरक्षक), शिखर धवन, मनीष पांडे, मयांक अग्रवाल, केदार जाधव, इशांक जग्गी, गुरक्रीत मान, अक्षर पटेल, अक्षय कर्नेवर, अशोक दिंडा, कुलवंत खेज्रोलीया, गोविंदा पोद्दार