विराट सचिनचं हे रेकॉर्ड तोडणार?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार दिवसेंदिवस यशाची नवी शिखरे गाठत आहे. तसेच महान खेळाडूंचे रेकॉर्ड रोज तोडत आहे. असच एक रेकॉर्ड आहे जे विराट येत्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत तोडू शकतो.

बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी विराटचे कसोटी मधील गुण ८७५ एवढे होते. पण मालिकेत लावलेल्या खणखणीत द्विशतकामुळे विराटचे हेच गुण ८९५ झाले. ज्यामुळे सार्वकालीन कसोटी क्रमवारीत विराट ३३व्या स्थानी पोहचला. ह्याच क्रमवारीमुळे त्याने ऑस्ट्रेलियन महान फलंदाज स्टिव्ह वॉ आणि अँडी फ्लॉवर यांच्या सार्वकालीन कसोटी क्रमावरीची बरोबरी केली.

२०१३ साली सचिनचे सार्वकालीन कसोटी गुणांकन हे ८९८ होते आणि क्रमांक होता ३१ वा. जर ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराटने चांगली कामगिरी केली तर हे भारतीयांकडून हे रेकॉर्ड विराटला बनवण्याची संधी मिळणार आहे.भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका २३ फेब्रुवारी पासून पुणे येथील कसोटीने होणार आहे.

सार्वकालीन कसोटी क्रमवारी(भारतीय)
सचिन ८९८गुण, क्रमांक-३१, सन-२०१३
विराट ८९५गुण, क्रमांक-३३, सन-२०१७

Comments are closed.