Aandolan Ek Suruvat Ek Shevat will show a different movement

आंदोलन या शब्दाच्या उच्चारातच खणखणीतपणा जाणवतो, आंदोलनं ही खूप प्रकारची असतात परंतु श्री कृपा प्रॉडक्शन निर्मितीसंस्थे अंतर्गत बाबुभोईर कोपरावाले निर्मित आणि प्रशांत मधुकर राणे लिखित- दिग्दर्शित आंदोलन..एक सुरवात एक शेवट नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. कोकणात या चित्रपटाचं सध्या वेगात चित्रिकरण सुरु आहे, चित्रपटात अरुण नलावडे, मिलिंद गवळी, निशा परुळेकर, विजय चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका असून आंदोलन चित्रपटाची खरी धुरा सागर पांझरी, संस्कृती कांबळी, प्रितेश पारकर आणि आदित्य नेररकर यांच्या हाती असणार आहे, चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या महिमा माळगांवकर आहेत.
गांधी, फुले, आंबेडकर, आगरकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई यांचा आदर्श ठेऊन समाजात यांच्यासारखं होण्याची ईच्छा बाळगणार्‍यांना पुस्तकी अभ्यास आणि खर्‍या पध्दतीने समाजात जगणं यात खूप फरक जाणवतो तेव्हा अशी पिढी काय पाऊल उचलणार, पुस्तकात असणारी समाजव्यवस्था आणि तिला प्रत्यक्षरपात साकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन म्हणजे हा चित्रपट होय. स्वातंत्र्या मिळून 150 वर्षे झाली तरी काही खेडी आजही गुलामगिरीतच खितपत पडली आहेत, आजच्या शिक्षणाचा खरंच समाजात जगण्यासाठी उपयोग आहे का? असे अनेक प्रश्न या चित्रपटाच्या माध्यमातून केले जाणार आहेत.
कोकणातील एका छोटयाशा खेडयात अरण नलावडे मुख्याध्यापक आणि मिलिंद मिलिंद गवळी शिक्षक असलेल्या एका शाळेतील 12 ते 16 वयोगटातील 3 मुलं आणि 1 मुलगी यांच्यात घडणारे नाटय म्हणजे आंदोलन चित्रपट होय, शिवाय अभिनेत्री निशा परुळेकरर एका वेगळ्या आणि जबरदस्त अशा भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. छायांकन – अमित सिंग, संकलन – आशिश म्हात्रे, संगीत – हर्षित अभिराज. चित्रपटात एकूण 3 गाणी आहेत.