छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘करारी लूक’मध्ये लाडका रितेश !

‘छत्रपती शिवाजी’ चित्रपटाचे दुसरे पोस्टर रितेशने प्रदर्शित केले आहे. पहिल्या पोस्टरमध्ये रितेश छत्रपतींच्या प्रतिमेसह दिसला होता. यावेळी रितेशचा खऱ्या अर्थाने संपूर्ण चेहऱ्याचा लूक दुसऱ्या पोस्टरमध्ये दिसत आहे.
या भव्य चित्रपटाची निर्मिती जेनेलिया देशमुख करणार असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव याचे दिग्दर्शन करणार आहेत.