झिंगाटनंतर अजय-अतुलचं नवं गाणं – बेबी ब्रिंग इट ऑन

bring-it-on-baby
सैराट सिनेमातील झिंगाट गाण्याने गायक, संगीतकार अजय-अतुल यांनी चाहत्यांना ठेका धरायला लावला. आता झिंगाटनंतर अजय-अतुल त्याच पठडीतील ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ हे गाणं घेऊन येत आहेत.
दिग्दर्शक गिरीष कुलकर्णी यांच्या जाऊंद्याना बाळासाहेब या सिनेमातील हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.
jau-dya-na-balasaheb‘बघ तरी गोडीत, लक्झरी गाडीत आलोया मै हू डॉन, बेबी ब्रिंग इट ऑन, आलिंगनाला’ असे या गाण्याचे बोल आहेत.
हे गाणं अजय – अतुलने लिहिलं असून, या गाण्याला त्यांनीच संगीत दिलं आहे, तर अजय गोगावलेने हे गायलं आहे.
जाऊंद्याना बाळासाहेब हा सिनेमा 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता भाऊ कदम, गिरीष कुलकर्णी, सई ताम्हणकर, मोहन जोशी, मनवा नाईक प्रमुख भूमिकेत आहेत.
पाहा ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ गाण्याचा व्हिडीओ
https://youtu.be/Dy-luaBeLgg